हनुमान जयंती निमित्त झरेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह
विष्णू महाराज कबीर यांचे काल्याचे किर्तन
झरेगाव / ज्ञानप्रवाह न्यूज- बार्शी तालुक्यातील झरेगाव येथे सालाबाद प्रमाणे हणुमान जयंती निमित्त 62 व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हनुमान मंदीरात करण्यात आले आहे.या सप्ताहा मध्ये महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांना आमंत्रीत करण्यात आले आहे.
झरेगाव येथे प्रतिवर्षी जय हनुमान जयंतीला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावकर्यांच्यावतीने केले जाते.या सप्ताहात तुकाराम गाथा भजनी पारायण,हरिपाठ, हरिजागर, काकडा आरती, तुकाराम गाथा चरित्र, करिकिर्तन याचे आयोजन केले आहे.
या सप्ताहात ह.भ.प.राहूल महाराज येडशीकर यांचे शनिवारी,ह.भ.प. चैतन्य महाराज देहुकर यांचे रविवारी, ह.भ.प. महादेव महाराज बोधले यांचे सोमवारी, ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांचे मंगळवारी,ह.भ.प. दत्ता महाराज अंबीरकर यांचे बुधवारी, ह.भ.प.सोपान महाराज गोळे यांचे गुरुवारी,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांची शुक्रवारी किर्तन सेवा होणार आहे.तर शनिवारी ह.भ.प.विष्णू महाराज कबीर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
साधकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळ, जय हनुमान भजनी मंडळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तानाजी सुरवसे 9527629357 आणि रणजीत संकपाळ 9552996811 यांच्याशी संपर्क साधावा.

