राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंढरपूर जिल्हा कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन भाजप पंचायत राज ग्रामविकास विभागाचे दत्तात्रय शिंदे,माजी नगरसेवक रमेश कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले व त्यानंतर सामूहिक अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना संतोष दामोदरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.हेडगेवार यांनी राष्ट्र उभारणीचे जे कार्य आरंभिले त्याची चर्चा करण्यात आली .
याप्रसंगी पंढरपूर तालुक्याचे संघचालक सुधाकर जोशी यांच्यासह संघ स्वयंसेवक उपस्थित होते.

