शिवसेनेच्या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला सत्कार

शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक वर्षा निवासस्थानी संपन्न

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०६/२०२४- शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक वर्षा निवासस्थानी आज दि.१० जून रोजी शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीपूर्वी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अक्षरधाम न्यू जर्सी, अमेरिका व माता वैष्णव देवीचा प्रसाद देऊन सत्कार केला.यावेळी शिवसेना नेते गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई ,भरत गोगावले, संजय राठोड,दिपक केसरकर,अब्दुल सत्तार, दादा भुसे ,उदय सामंत,प्रताप सरनाईक आदींसह मंत्री,उपनेते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top