अपेक्षित संख्येपेक्षा भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे दर्शनासाठी मंदिरात ढकलाढकली

अपेक्षित संख्येपेक्षा भाविकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे दर्शनासाठी मंदिरात ढकलाढकली

पंढरपूर /ज्ञान प्रवाह न्यूज,दि.२६/०६/२०२४ – आषाढी वारी च्या निमित्ताने पंढरपूर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली आहे.आषाढी वारी दरम्यान पंढरपूर येथे दर्शनासाठी जास्त संख्येने भाविक येतात.ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांची पालखीचे प्रस्थान ठेवल्यानंतर भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात.दर्शन करुन पुन्हा पालखीत पायी चालत येण्यासाठी सामिल होतात.

त्यामुळे पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची होणारी गर्दी यावर्षी जास्त संख्येने आहे.मंदिर समितीचे पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी मंदिरात भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र अपेक्षित भाविकांच्या संख्येपेक्षा लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे आज सकाळपासून रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांत धक्काबुक्की होत असल्याचे भाविकांमधून सांगितले जात आहे.

तरी मंदिर समिती व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाने भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी भाविकांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Back To Top