खासदार शरद पवार यांनी खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे घेतली भेट
नवी दिल्ली,दि.०२/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली.
यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे , माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते पाटील, संजय दिना पाटील, सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे उपस्थित होते.

याप्रसंगी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात पंढरपूर आषाढी पायी वारीची परंपरा आहे. या वारीत सहभागी व्हावे यासाठी विरोधी पक्षनेते कॉंग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले.

