वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून वडार समाजास न्याय द्यावा – मनसे नेते दिलीप धोत्रे


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतंत्र महामंडळासाठी सकारात्मक प्रतिसाद


पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०७/२०२४- महाराष्ट्रातील वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून वडार समाजास न्याय द्यावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना मनसे नेते दिलीप धोत्रे,शिवसेना सोलापूर जिल्हा संघटक संजय बंदपट्टे,वडार समाजाचे अध्यक्ष दत्ता भोसले, नगरसेवक अंबादास धोत्रे यांनी पंढरपूर येथे दिले.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर येथे आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सरकारी महापूजा करण्यासाठी आले असताना महाराष्ट्रातील वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून वडार समाजास न्याय द्यावा या मागणीचे निवेदन त्यांना दिले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ स्थापन करून ते कार्यरत करू असे आश्वासन दिले.

