पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताचा पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक
भारताचा सर्जिकल स्ट्राईक ज्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव
तिन्ही दलांच्या संयुक्त कारवाईत नऊ ठिकाणी हल्ले यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त
भारताला अतिरेक्यांविरोधात कारवाईचा अधिकार – अमेरिका

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, ज्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरा तिन्ही दलांनी संयुक्त कारवाईत नऊ ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे.भारताच्या कारवाईची ही माहिती पहाटे १ वाजण्याच्या सुमारास समोर आली.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर मुझफ्फराबाद शहराभोवती असलेल्या पर्वतांजवळ अनेक मोठे स्फोट ऐकू आल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.स्फोटांनंतर शहरातील वीजपुरवठा खंडित झाला.यानंतर काही वेळातच पाकिस्तानी लष्कराकडून एक निवेदन आले.भारताच्या कृतीला प्रत्युत्तर देऊ असे त्यांनी सांगितले.भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हल्ला केल्याची अधिकृत माहिती समोर आली. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. एकूण ९ ठिकाणी हल्ले करण्यात आले.

दुपारी १.४५ – पाकिस्तानच्या डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने कोटली, बहावलपूर आणि मुझफ्फराबादमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.
दुपारी ४.१३ वाजता – तिन्ही सैन्य,भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा वापर करण्यात आला. यामध्ये प्रिसिजन अटॅक वेपन सिस्टीमचा वापर करण्यात आला.
४.३२ वाजता: अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतीय हल्ल्याबाबत पाकिस्तानी एनएसए आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांच्याशी चर्चा केली.

४.३५ वाजता: भारतीय हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी उड्डाणे रद्द करण्यात आली.
५.०४ वाजता – हल्ला झालेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहेत. पाकिस्तानमधील तळांमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे.
५.२७ वाजता – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प म्हणाले असे काहीतरी घडणार याची आम्हाला कल्पना होती तर परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो म्हणाले की,आम्ही भारत आणि पाकिस्तान मधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अमेरिकेला आशा आहे की हे लवकरच संपेल.भारताविरुध्द कोणत्याही प्रकारे युध्द करु नका असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे.कारण भारताला अतिरेक्यांविरोधात कारवाईचा अधिकार आहे.
५.४५ वाजता- कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी उड्डाणे रद्द केली.
बहावलपूर हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे.
मुरीदके सांबाच्या समोरील सीमेपासून ३० किमी आत लष्कर-ए-तैयबा कॅम्प. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवादी येथूनच आले होते
गुलपूर हे पूंछ-राजौरीपासून नियंत्रण रेषेच्या आत ३५ किमी अंतरावर आहे. २० एप्रिल २०२३ रोजी पूंछ येथे झालेला हल्ला आणि जून २०२४ मध्ये प्रवासी बसवरील हल्ला यांचे मूळ येथेच आहे.

पीओजेकेच्या तंगधार सेक्टरमध्ये ३० किमी आत लष्कर कॅम्प सवाई.
बिलाल कॅम्प हे जैश-ए-मोहम्मदचे लाँचपॅड आहे.
राजौरीच्या समोर नियंत्रण रेषेच्या आत १५ किमी अंतरावर लष्कर कोटली कॅम्प. लष्कराचे बॉम्बस्फोट प्रशिक्षण केंद्र, ५० दहशतवाद्यांची क्षमता.
बर्नाला कॅम्प राजौरी समोरील एलओसीच्या आत 10 किमी
सांबा-कठुआच्या समोरील आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत ८ किमी अंतरावर, सरजल कॅम्प जैश कॅम्प
सियालकोटजवळील आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ किमी आत मेहमूना कॅम्प, हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र