स्वत:च्या मुलीस ठार मारल्या प्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल

स्वत:च्या मुलीस ठार मारल्याप्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील डोणज येथे जन्मदात्या आईने स्वत:च्या चार वर्षीय मुलीस जीवे ठार मारल्या प्रकरणी आई स्नेहल उर्फ स्नेहा श्रीधर तेली हिच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि.13 रोजी सकाळी 9 च्या पुर्वी आई स्नेहल हिने चार वर्षाची मुलगी मैथिली हिस ओढणीने गळफास लावून जीवे ठार मारले. तद्नंतर आई स्नेहाने स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली होती.यातील दोघी घराच्या माळवदाच्या हुकाला ओढणीने गळफास लावून लटकत असल्याचे यातील फिर्यादी सिध्दाराम बिराजदार रा.नंदूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.फिर्यादी हे घटनास्थळी आले असता दरवाज्याच्या सांधीतून आत पाहिल्यानंतर त्यांना त्या दोघी लटकत असल्याचे निदर्शनास आले.दरवाज्याला आतून कडी असल्याने उपस्थितांनी कुर्‍हाडीच्या सहाय्याने दरवाजाच्या कडीचे हुक काढून घरात प्रवेश केला व नातेवाईकांच्या मदतीने मेव्हुणी स्नेहा व तिची मुलगी मैथिली यांच्या गळ्यातील गळफास सोडवून जमिनीवर झोपवले. तद्नंतर डॉ.गौरीशंकर बुगडे यांना बोलावून दोघांची तपासणी केली असता डॉक्टरांनी दोघींना मृत घोषीत केले.

कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन मेव्हुणी स्नेहा हिने तिची मुलगी मैथिली हिस ओढणीने गळफास लावून तिला जीवे ठार मारुन त्यानंतर स्नेहाने स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी सुरू केला आहे.

मयत स्नेहा हिच्या पतीला दारुचे व्यसन होते. त्यामुळे दारुच्या व्यसनाला त्रस्त होवून ती माहेरी गेल्या दोन वर्षापासून डोणज येथे आई वडीलाकडे रहावयास आली होती. आई व वडील अपंग असून ते मजूरी करुन जीवन जगत आहेत.नवराही सतत दारु पित असल्याने नैराश्येतून स्नेहाने स्वत:च्या चार वर्षीय मुलीस ठार मारुन स्वत: आत्महत्या करुन जीवन संपविल्याचे पोलीसात माहिती मिळाल्याचे तपासाधिकार्‍यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Back To Top