वृध्द आई,वडील बेपत्ता झाल्याची मुलाची पोलीसात तक्रार
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील धर्मगांवाहून लक्ष्मी दहिवडी येथे निघालेले वयोवृध्द आई व वडील बेपत्ता झाले असल्याची तक्रार मुलाने मंगळवेढा पोलीसात दिली असून पोलीस त्या बेपत्ता वृध्दांचा कसून तपास करत आहेत.

यातील खबर देणारे संतोष सिध्देश्वर आळगे रा.धर्मगाव यांचे वडील सिध्देश्वर दादा आळगे वय 70 वर्षे,आई मंगल सिध्देश्वर आळगे वय 65 वर्षे हे संतोष सिध्देश्वर आळगे रा.धर्मगाव यांचे लहान भाऊ धनंजय आळगे यांच्याकडे लक्ष्मी दहिवडी येथे जावून येतो असे सांगून घरातून दि.11 मे रोजी सकाळी 8 वाजता बाहेर पडले. त्यानंतर ते अद्यापपर्यंत लक्ष्मी दहिवडी पर्यंत पोहचले नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांचा मंगळवेढा शहर व नातेवाईकांसह सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत.
त्यांचे वर्णन सिध्देश्वर आळगे वर्ण सावळा वय 70,उंची 160 सें.मी.,अंगात नेहरु शर्ट, विजार,शरीर सडपातळ बांधा तर मंगल आळगे यांचे वय 65,वर्ण सावळा,उंची 155 सें.मी., अंगात सहावारी साडी,शरीर मध्यम बांधा अशा वर्णणाचे वृध्द जोडपे कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.