अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी : खासदार प्रणिती शिंदे
गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी,मिरी,अरबळी, गावाला भेट, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची पाहणी,येणकी मिरी वडापुर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुका गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी, मिरी, अरबळी या गावांना भेट देऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. ग्रामस्थांचे निवेदन स्विकारून समस्या लवकरात लवकर सोडविणार असल्याचे सांगितले.
तसेच अवकाळी पाऊसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील येवती,पापरी या गावातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे सूचना दिल्या.शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाकडून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यांना धीर दिला.

खासदार प्रणिती शिंदे यांच्या खासदार निधीतून येणकी मिरी वडापूर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी १५,८८,६८९ /- निधी मंजूर करण्यात आले त्यातून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी मोहोळ तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार,संदीप पाटील, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष अँड मयूर खरात, सरपंच नौशाद पाटील,जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस आरिफ पठाण,उपसरपंच दत्तात्रय राऊत,आकाश खरात, रफिक पाटील,विनायक चोरगे,नितीन शिंदे, आबासाहेब जगदाळे, अप्पासाहेब पाटील, सीताराम जाधव, बिरप्पा काळे, उत्तम तडसरे,शबाना पाटील,राहुल पाटील, कुंडलिक तोडकर, दीपक जाधव,शुभम बाबर,नारायण गुंड,श्रीपती खरात,हणमंतू सरवदे, अप्पा पाटील, कुबेर गायकवाड, पुजारी सर,कोठे मॅडम,काशिद सर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवा सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


