मंगळवेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 1417 विविध दाखल्याचे शालेय मुलांना वाटप
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह प्रतिनिधी- मंगळवेढा महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत विविध आठ मंडल मधून शालेय मुलांसाठी 1417 विविध दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती निवासी महसूल नायब तहसिलदार शुभांगी जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची विविध दाखल्याबाबत गैरसोय होवू नये म्हणून तालुका निहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत शिबीर राबवण्यात आले. या अंतर्गत मंगळवेढा मंडल मध्ये 222 दाखले, मरवडे मंडल 178 दाखले, हुलजंती मंडल 158 दाखले, पाठखळ मंडल 73 दाखले, भोसे मंडल 175 दाखले, मारापूर मंडल 123 दाखले, आंधळगाव मंडल 182 दाखले, बोराळे मंडल 306 असे एकूण 8 मंडल मध्ये 1417 दाखल्याचे वाटप करण्यात आले.

सर्वाधिक दाखले बोराळे मंडलमध्ये वाटप केल्याची नोंद झाली आहे. यामध्ये रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रेशन कार्ड, नॉन क्रिमिलेअर असे विविध दाखले शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून पुढील प्रवेशासाठी मुलांना विविध दाखल्याची गरज असल्याने त्या अनुषंगाने या शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी महसूल विभागातील मंडल अधिकारी, तलाठी व अन्य कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.

