मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे

आ समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे – आ.समाधान आवताडे

मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा आगारात नव्या ५ बसेस दाखल झाल्या असून या बसेसचे लोकार्पण आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार आवताडे यांनी मंगळवेढा परिवहन पदाधिकारी व इतर मंडळींच्या सोबत या नव्या बसमधून आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेतला.

ग्रामीण भागाची जीवन वाहिनी म्हणून एसटी महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावत असून या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्याने करत आहे.मंगळवेढा आगारास मिळालेल्या या नव्या बसेसमुळे मंगळवेढेकरांना निश्चितच दिलासा मिळणार असून आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होणार आहे.मंगळवेढा तालुक्याला दिलेल्या या ५ नव्या बसेसबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे मनापासून आभार मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्यावतीने आमदार समाधान यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रकाश गायकवाड,जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, येताळा भगत,राजेंद्र सुरवसे, लक्ष्मण जगताप,औदुंबर वाडदेकर,चंद्रकांत पडवळे,अजित जगताप, दादा ओमने, सतीश मोहिते,खंडू खंदारे, प्रवीण खवतोडे,बबलु सुतार, डॉ.शरद शिर्के, कैलास कोळी,महादेव जाधव,संतोष मोरे, शिवाजी सरगर,सचिन शिंदे,डी.सी.जाधव, युवराज घुले,नागेश डोंगरे,सुदर्शन यादव, संतोष मोगले,प्रताप सावजी,रमेश जोशी, सोलापूर जिल्हा परिवहन विभागीय नियंत्रक अमोल गोंजारी, मंगळवेढा आगार प्रमुख संजय भोसले,आनंद मुढे, सिद्धेश्वर कोकरे, गंगाधर काकनकी,क्रांती दत्तू आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top