अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई

अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई

वाडा पोलीस ठाणे ची उत्कृष्ट कारवाई

पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज – पोलीस अधीक्षक पालघर यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

वाडा पोलीस ठाणे हद्दित दि.०५/०८/२०२५ रोजी १०:३० वाजण्याच्या सुमारास वाडा पोलीसांना गुप्त बातमी मिळाली की, वाडा- भिवंडी रोडवरील पाहुणीपाडा गावच्या हद्दीत अंमली पदार्थांची अवैधरित्या वाहतुक होणार आहे.सदर माहिती मिळताच पोनि/दत्तात्रय किंद्रे वाडा पोलीस ठाणे यांनी पथक तयार केले.

सदर पथकाने वाडा-भिवंडी रोडवर पाहुणीपाडा गावाच्या हद्दीत सापळा रचला असता पाहुणीपाडा दत्त मंदिराच्या समोर दोन इसम संशयीतरित्या उभे होते.त्यापैकी एका इसमाच्या पाठीवर निळ्या रंगाची बॅग होती.त्या दोन्ही इसमांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव विचारले असता १) हेमंत जामु तांडी, वय ३१ वर्षे, २) किशोर राम कुमार, वय २६ वर्षे, दोन्ही सध्या रा.खुपरी, ता. वाडा,जि.पालघर,मुळ रा. कुसुम खुटी, पो.खुवापादर, ता.केसिंगा, जि. कालाहंडी राज्य ओरीसा असे सांगितले. त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता खाकी रंगाच्या प्लास्टीकच्या चिकटपट्टीने पॅक केलेले ४ बॉक्समध्ये एकूण ४ किलो १३३ ग्रॅम वजनाचा एकूण ६६,१२८/- रुपयांचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. नमुद इसमांकडुन मुद्देमाल हस्तगत करून वाडा पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ॥ ३२४/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनीयम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास हा पोउपनि/भारत वणवे वाडा पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर ,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर,उप विभागीय पोलीस अधिकारी एस एस.मेहेर जव्हार विभाग यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे ,सपोनि/भगवंत चौधरी, पोउपनिरी/सागर मालकर, सफौ/दयानंद पाटील, सफौ/गुरुनाथ गोतारणे,पोहवा/विजय मढवी, पोहवा/केशव गायकवाड, पोअंम./गजानन जाधव, पो.अंम./संतोष वाकचौरे, पो. अंम. / सचिन भोये,पो.अंम./संजिव सुरवसे, पो.अंम./भुषण खिलारे, पो.अंम. / कमलाकर पाटील सर्व नेमणुक वाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top