BSNL ने मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध दिली करून
BSNL आता जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या खाजगी कंपन्यांना टक्कर देणार
मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – सरकारी मालकीची दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने कंपनीचे ग्राहकांना मोबाईल नेटवर्क नसतानाही व्हॉइस कॉल करू शकतील अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.BSNL ने त्यांची नवीन VoWiFi (व्हॉइस ओव्हर वाय-फाय) सेवा सुरू केली आहे, ज्याद्वारे वापरकर्ते मोबाईल नेटवर्कऐवजी वाय-फाय कनेक्शनद्वारे कॉल करू शकतील.यामुळे BSNL आता जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या खाजगी कंपन्यांना टक्कर देणार आहे कारण या खाजगी कंपन्या ही सुविधा आधीच देत आहे.
या सेवेचे सॉफ्ट लाँचिंग २ ऑक्टोबर रोजी दूरसंचार विभागाचे सचिव नीरज मित्तल यांनी केले.सध्या ही सेवा दक्षिण आणि पश्चिम सर्कलमध्ये सुरू करण्यात आली आहे, आणि लवकरच ती देशभरात उपलब्ध होईल.बीएसएनएलने अलीकडेच मुंबईत ४ जी आणि ई सिम सेवा सुरू केली आहे. यापूर्वी तामिळनाडूमध्ये ही सेवा देण्यात आली होती.
बीएसएनएलने अलीकडेच देशभरात १,००,००० हून अधिक मोबाइल टॉवर बसवून ४ जी सेवेचा विस्तार केला आहे. येत्या काळात कंपनीची सुमारे ९७,५०० अधिक टॉवर बसवण्याची योजना आहे. बीएसएनएलच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त व्होवायफाय सेवेचे लाँचिंग हा महत्त्वाचा टप्पा आहे.

बीएसएनएलची व्होवायफाय सेवा ही विशेषतः जिथे मोबाइल नेटवर्क कव्हरेज कमकुवत आहे अशा भागात फायदेशीर ठरेल.वापरकर्ते त्यांच्या घरातील वाय-फाय किंवा ब्रॉडबँड कनेक्शनद्वारे कोणत्याही व्यत्ययाशिवाय स्पष्ट आणि स्थिर कॉल करू शकतील.मात्र वापरकर्त्यांकडे व्होवायफाय ला सपोर्ट करणारा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.बहुतेक नवीन अँड्रॉइड आणि आयफोन मॉडेल्समध्ये सेटिंग्जमध्ये व्होवायफाय हा पर्याय उपलब्ध आहे.
बीएसएनएलच्या या पावलामुळे आता ते जिओ, एअरटेल आणि व्हीआय सारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांशी थेट स्पर्धेत उतरले आहे. पूर्वी फक्त या खाजगी कंपन्या वाय-फाय कॉलिंग देत असत, परंतु आता बीएसएनएलही या श्रेणीत सामील झाले आहे. भारतीय टेलिकॉम बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि नेटवर्कचे आधुनिकीकरण करण्यासाठी बीएसएनएलसाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो.
बीएसएनएलने ही नवीन व्होवायफाय सेवा सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत असल्याचे सांगितले आहे.यात वापरकर्त्यांना कॉल करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स वर ट्वीट केले आहे की ही सेवा ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सुधारित कनेक्टिव्हिटी आणि अखंडीत कॉलिंगचा अनुभव प्रदान करेल.