आपने केला निर्धार प्रणिती शिंदेंना विजयी करणार

आपने केला निर्धार प्रणिती शिंदेंना विजयी करणार

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – इंडिया आघाडीकडून सोलापूर लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्या निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीने आपला पाठिंबा जाहीर केला.आम आदमी पार्टीच्या वतीने इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.ही निवडणूक देशाचे संविधान आणि लोकशाही रक्षणासाठी महत्वाची निवडणूक आहे.त्यामुळे केंद्रातील हुकूमशाहीच्या विरोधातील हा लढा लढण्यासाठीच सोलापुरात आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीला पाठिंबा दिला असल्याचे आपचे जिल्हाध्यक्ष महादेव मोरे पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले की, संविधानाच्या संवर्धनासाठी आपचे सर्व कार्यकर्ते आपल्या जिवाचे रान करून काँग्रेस आणि INDI आघाडीच्या उमेदवार प्रणिती ताई शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रचारात उतरणार आहेत.

देशात जाती धर्मामध्ये विष पेरण्याचे काम सुरू आहे. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण केली जात आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे.त्यामुळे या हुकूमशाहीला सत्तेतून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीचे हात बळकट करायचे आहेत. म्हणूनच आपने प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

या पाठिंब्याच्या कार्यक्रमावेळी जिल्हा उपाध्यक्ष ऍड.श्री. खतीब,शहराध्यक्ष निहाल किरनळ्ळी,युवाध्यक्ष निलेश संगेपाग,महा सचिव मल्लिकार्जुन पिलगेरी,जिल्हा महासचिव सतीश लोंढे-पाटील,शहर खजिनदार सुचित्रा वाघमारे, जिल्हा प्रवक्ते बंडू मोरे, उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे, अनिल वाले,प्रमोद अवताडे,बसवराज सारंगमठ, रविकांत शिरगिरे,आंनद जाधव, अजय दारलू,अल्ताब तांबोळी,आकाश गायकवाड, प्रसाद बाबानगरे आदी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top