भोरमध्ये ७ शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप — आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम
शिक्षणासाठी हातभार! भोर,राजगड आणि मुळशी परिसरात विद्यार्थ्यांना साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न
भोर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ नोव्हेंबर २०२५– शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याच्या उद्देशाने भोर, राजगड, मुळशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र प्रदेश गड-किल्ले संवर्धन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील सात शाळांमध्ये शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

हा उपक्रम आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत, यासाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला बाळासाहेब मांडेकर (अध्यक्ष, शंकरभाऊ मांडेकर युवा मंच), संकेत धनावडे (अध्यक्ष, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व गड-किल्ले संवर्धन सेल), शिवव्याख्याते संदीप खाटपे पाटील (संस्थापक खजिनदार, स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण), शंकर चिकणे (पुणे जिल्हा संघटक), तानाजी चिकणे (सामाजिक कार्यकर्ता), अजित थोपटे (उपाध्यक्ष, भोर तालुका), महेंद्र देवघरे (पुणे जिल्हा अध्यक्ष, गड-किल्ले संवर्धन सेल) यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवभक्त आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शालेय साहित्य वितरणा सारखे उपक्रम सतत राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून ग्रामीण भागात शिक्षणाला चालना देणारा सामाजिक उपक्रम म्हणून त्याचे कौतुक होत आहे.

