लोकशाहीची शोकांतिका की व्यवस्थेचे अपयश ? निवडणुकीत वाढते आरोप- प्रत्यारोप
लोकशाही संकटात: पैसा,दबाव आणि दादागिरी : मतदान व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह DemocracyInDanger
निवडणूक प्रक्रियेत वाढत चाललेली अनैतिकता, पैसा व दबावाच्या राजकारणामुळे लोकशाही संकटात सापडली आहे. ही स्थिती म्हणजे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असून नागरिकांनी सजग राहण्याची गरज अधोरेखित होते.

विशेष लेख
PoliticalNews सध्या राज्यातच नव्हे तर देशभरात निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.मतदानापूर्वी आणि मतदान संपल्यानंतर Election News उमेदवारांवर होणारे आरोप- प्रत्यारोप,पैशांचा वापर,दबाव तंत्र, दादागिरी व गैरप्रकारामुळे लोकशाहीच्या मूल्यांवरच घाला घातला जात असल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती म्हणजे लोकशाहीसाठी स्पष्टपणे धोक्याची घंटा ठरत आहे DemocracyInDanger .
निवडणूक ही लोकशाहीची आत्मा मानली जाते.मात्र अलीकडच्या काळात निवडणुकीदरम्यान तसेच निकालानंतर समोर येणाऱ्या घटनांमुळे नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहेत. उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर खर्च, मतदारांवर अप्रत्यक्ष दबाव, प्रचारातील अनैतिक पद्धती यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहिलेली नाही, अशी भावना बळावत आहे.
मतदान यंत्रणा ही आपल्या लोकशाहीची कणा आहे.परंतु वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे खरंच आपली लोकशाही सुरक्षित आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.निवडणूक यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होणे ही बाब अत्यंत गंभीर असून ती लोकशाहीच्या शोकांतिकेची नांदी ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर मतदारांनी अधिक सजग राहणे,विवेकबुद्धीने मतदान करणे आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणे आवश्यक आहे. तसेच प्रशासन व निवडणूक आयोगानेही कठोर भूमिका घेत गैरप्रकारांवर ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. अन्यथा ही धोक्याची घंटा उद्याच्या लोकशाहीसाठी विनाशकारी ठरू शकते.
लोकशाही,निवडणूक प्रक्रिया, #MaharashtraNews, PoliticalNews,#ElectionNews,DemocracyInDanger,IndianPolitics,BreakingNewsMarathi,अनैतिकता,मतदान,राजकारण,भ्रष्टाचार, लोकशाही संकट,निवडणूक गैरप्रकार,
