सावित्रीबाई फुले जयंती व नगरसेवक लोकेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
पंढरपुरात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य शिक्षणासाठी मनसेची पुढाकाराची भूमिका
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व नगरसेवक लोकेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरा तील प्रभाग क्रमांक १७ मधील नगरपालिका शाळा क्रमांक ९ मध्ये मनसेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
pandharpur-prabhag17-mns-savitribai-phule-jayanti-shaikshanik-sahitya
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – Pandharpur News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य तसेच नगरसेवक लोकेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील नगरपालिका शाळा क्रमांक ९ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विद्यार्थ्यांना शालोपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके,नगरसेवक माधुरी दिलीप धोत्रे, नगरसेवक लोकेश नागेश यादव, समाजसेवक बाबा चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवली. त्यांच्या विचारांना अभिवादन करत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले शालोपयोगी साहित्य देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल तसेच समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. मनसेच्या या सामाजिक कार्याचे पालक व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
