ग्रामीण खेळाडू सर्वसंपन्न व्हावेत यासाठी आटपाडीत क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी- अमरसिंह देशमुख

ग्रामीण खेळाडू सर्वसंपन्न व्हावेत यासाठीच आटपाडीत क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची उभारणी – अमरसिंह देशमुख

आटपाडी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि .१५/०८/२०२४- ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सर्व सोयी, सुविधा, मार्गदर्शन मिळावे आणि या तंत्रशुध्द क्रिकेट प्रशिक्षण केंद्रामधून भविष्यात, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या हेतूनेच हे केंद्र आपण सुरू केल्याचे सांगली जिल्हा परिषदेचे चे माजी अध्यक्ष आणि मागच्या पिढीतील उत्तम खेळाडू अमरसिंह देशमुख यांनी सांगितले .

श्रीमंत बाबासाहेब देशमुख स्पोर्टस अकॅडमी च्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते तहसीलदार सागर ढवळे आणि अमरसिह देशमुख यांच्या उपस्थित करण्यात आला. त्याप्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्तावीक करताना अमरसिंह देशमुख बोलत होते .

यावेळी मागच्या पिढीतील क्रिकेट खेळाडू तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ, क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे मुख्य प्रशिक्षक गणेश चव्हाण, बाबासाहेब देशमुख बॅकेचे चेअरमन बाळासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, माजी जि.प. सदस्य अरुण बालटे, युवक नेते रुषीकेश देशमुख, महेश देशमुख,श्रीरंग कदम, दादासाहेब मरगळे, सावंता पुसावळे, गजेंद्र पिसे, बाळासाहेब करांडे, आटपाडी एज्यूकेशन संस्थेचे निरीक्षक अनुक्रमे प्रकाश नामदास सर, ए . के.गायकवाड सर, प्रा.गौरव चव्हाण आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिनेश देशमुख यांनी केले .

Leave a Reply

Back To Top