द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये गुड टच,बॅड टचवर समुपदेशन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,२३/०८/२०२४: द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे नुकत्याच स्थापन झालेल्या सखी सावित्री समितीच्या वतीने गुड टच व बॅड टच यावर माहितीपूर्ण समुपदेशन आयोजित करण्यात आली होती .
समितीच्या डॉक्टर प्रतिनिधी डॉ.सौ.संगीता पाटील यांचे गुड टच व बॅड टच यावर मार्गदर्शन झाले.यावेळी त्यांनी आठवी ते दहावी शिकत असलेल्या मुलींना आपले स्वतःचे रक्षण कसे करावे,कठीण परिस्थितीतून कसे स्वतःला सावरावे, आणीबाणीच्या काळात कोणती दक्षता घ्यावी यावर सप्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. स्त्री शरीराची शास्त्रीय माहिती दिली. यावेळी अनेक मुलींचे शंकानिरसन केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.दीपाली सतपाल मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.भक्ती रत्नपारखी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.आयाचित मॅडम यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस एस कुलकर्णी मॅडम, सौ.बाड मॅडम, सौ. फडके मॅडम उपस्थित होत्या.
प्रारंभी सखी सावित्री मंच ची स्थापना करण्यात आली. याबाबत प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी यांनी सद्यस्थितीत मुलींच्या संरक्षणासाठी प्रशालेने घेतलेल्या उपक्रमाची माहिती दिली. प्रशाला सीसीटीव्ही, तक्रारपेटी, नियमित निर्भया पथक भेट, हंगामी कर्मचारी माहिती व त्यांचे समुपदेशन यांनी परिपूर्ण असल्याबाबतची माहिती दिली.
प्रशालेचे उपमुख्याध्यापक एन.बी.बडवे सर, ज्येष्ठ शिक्षक आर.एस.कुलकर्णी सर यांचे याप्रसंगी सहकार्य लाभले.

