टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी 12 जुनला पेन्शन अदालत

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी 12 जून रोजी पंढरपुरात पेन्शन अदालत; 5 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पोस्टल पेन्शनधारकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पंढरपुरात विशेष पेन्शन अदालत

पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.0३ – टपाल विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी पंढरपूर येथे पोस्टल पेन्शन अदालतीचे दि. 12 जुनला सकाळी 11.00 वाजता अधीक्षक डाकघर यांचे कार्यालय, पंढरपूर विभाग, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले आहे.

निवृत्तवेतनधारकांच्या लाभाशी संबंधीत तक्रारी, जे टपालविभागा तून निवृत्त झाले आहेत व ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, पंढरपूर टपाल विभागामधील निवृत्तीधारकांचे तीन महिन्यांच्या आत निपटारा झालेला नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्दयासह प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. तसेच धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनर्वलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

निवृत्ती वेतनधारकांनी आपले अर्ज मुन्ना कुमार,अधीक्षक डाकघर, पंढरपूर विभाग 413304 येथे दि. 05 जुन 2026 रोजी पर्यंत पाठवावेत.नंतर मिळालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही असे अधीक्षक डाकघर पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Back To Top