पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच विजयी करा – माजी आमदार राजन पाटील

ग्रामस्थांची एकच पुकार पुन्हा येणार मोदी सरकार

सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज दि.२०/०४/२०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील अर्धनारी गावाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच प्रचंड बहुमताने विजयी करासातपुते यांनी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी आपुलकीने स्वागत करत सत्कार केला आणि लोकसभा विजयासाठी शुभेच्छा देत यंदा तुम्हीच खासदार होणार असा विश्वास दिला.

यावेळी ज्येष्ठ नेते व मा.आमदार राजन पाटील यांनी मार्गदर्शन करत गावागावांत झालेली रस्त्यांची कामे आणि जनतेच्या फायद्यासाठी शासनाकडून राबविलेल्या योजनांबद्दल माहिती दिली. सोलापूरच्या प्रगतीसाठी खंबीर नेतृत्वाची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यासाठी सक्षम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारालाच प्रचंड बहुमताने विजयी करा,असे आवाहन केले.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते व मा.आमदार राजन पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, रमेश माने तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top