पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करा – ख्वाजा बिलाल
चेतन नरोटे यांच्या प्रचार सभेत काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल यांचे आवाहन
हिंदू – मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचा हैदराबादवाल्यांचा अजेंडा
सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/११/२०२४: हिंदू – मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवण्याचा हैदराबादवाल्यांचा अजेंडा असल्याचा आरोप करत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी तसेच महाराष्ट्रात पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करा.काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल (हैदराबाद) यांनी सोलापुरात केले.

विधानसभा निवडणुकीतील सोलापूर शहर मध्य मतदार संघातील महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ सुत मिल जवळील समाधाननगर आणि बेगम पेठ येथे आयोजित सभेत ते बोलत होते.यावेळी विचार मंचावर काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे,माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, कोमोरो सय्यद, मोहसीन पिरजादे,धोंडप्पा तोरणगी,एजाज बागवान आदींसह मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी एमआयएम पक्षाचे नाव न घेता आपल्या भाषणात जोरदार टीका केली.हिंदू -मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा अजेंडा घेऊन हैदराबादहून लोक येतात.त्या लोकांचा उद्देश निवडणूक जिंकणे हा नाही.सोलापुरात त्यांनी चारदा निवडणूक लढवली.मात्र प्रत्येक वेळा निवडणुकीत त्यांचा मतांचा आलेख खाली येत आहे.भाजपला रोखण्यासाठी सोलापूर शहरामध्य आलो असल्याचे ते सांगतात मात्र तसे वास्तवात नाही. वास्तविक पाहता हैदराबाद येथील एमआयएमचे मुख्य कार्यालय परिसरातील दारुसलाम विधानसभा मतदारसंघाचा आमदार भाजपाचा आहे.त्यांना भाजपच्या उमेदवाराला तिथे ते रोखता आले नाही. इथे सोलापूर शहर मध्य मधून भाजपाला पराभूत करण्यासाठी लढत असल्याचा कांगावा करत आहेत.भाजपाचे हे एजंट काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत.तेव्हा सुजाण मतदारांनी महाराष्ट्रात पुरोगामी मुख्यमंत्री करण्यासाठी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे हात बळकट करावे. दिल्लीत पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यासाठी सोलापुरात शहर मध्य मतदार संघातील काँग्रेसचे धडाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांना विजयी करावे,असे आवाहन यावेळी निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी केले.
तुम्ही – हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये कितीही भांडणे लावा.आम्ही मात्र मुस्लिम बांधव हिंदू बांधवांना विजयी करण्यासाठी खंबीर साथ देणार असल्याचे जोरदार उत्तर संबंधितांना या निवडणुकीत द्यावे, असे आवाहन निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

काँग्रेसचे चेतन नरोटे हे हिंदू – मुस्लिम दोघांनाही आपले वाटणारे उमेदवार
बिलाल पुढे म्हणाले,मी शहर मध्य मतदार संघात संघातील हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधला तेव्हा सर्वांनी मला सांगितले की, चेतन नरोटे हे जेवढे हिंदूंचे आहेत तितकेच मुस्लिम समाजाला जवळचे आहेत.हे ऐकून मला समाधान वाटले.त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही निरीक्षक ख्वाजा बिलाल यांनी केले.