रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडेंची अधिकृत नियुक्ती

रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी गौतम बरडे यांची अधिकृत नियुक्ती

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार असंघटित कामगार क्षेत्रातील टिटवाळा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते गौतम बरडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी अधिकृत निवड करण्यात आली अशी अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे व राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली.

आज मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी गौतम बरडे यांना रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले.

गौतम बरडे यांनी अनेक वर्षे असंघटित कामगार क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ठाणे,मुंबई,पालघर,रायगड सह राज्यभरात गौतम बरडे यांनी असंघटित कामगारांचे संघटन उभे केले असून अनेक असंघटित कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. असंघटित कामगारांचे प्रश्न सोडविण्यात गौतम बरडे सदैव प्रयत्नशील असतात.

Leave a Reply

Back To Top