जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती भंडीशेगाव शाळेत शिक्षण सप्ताह साजरा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती भंडीशेगाव शाळेत शिक्षण सप्ताह साजरा शेळवे /संभाजी वाघुले –शिक्षण सप्ताह अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती भंडीशेगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर या ठिकाणी 22 जुलै ते 28 जुलै 2024 पर्यंत अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती,मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक…

Read More

वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप

वाढदिवसाच्या औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशालेत क्रीडा साहित्याचे वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन नाईकनवरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पटवर्धन कुरोली प्रशाला येथे क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून फुल ना फुलाची पाकळी म्हणून सचिन नाईकनवरे मित्र परिवाराच्यावतीने…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न- व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.26 – आषाढी एकादशी दि.17 जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.त्यानुसार दि.07 जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता.श्री विठ्ठलास लोड…

Read More

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ

प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२४- प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून आता रविवार, दि. २८ जुलै २०२४ (सायं.५.००) पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे,अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे…

Read More

नागनाथ कदम यांचे निधन

नागनाथ कदम यांचे निधन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०७/२०२४- पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील नागनाथ आबा कदम यांचे मंगळवार दि.23 रोजी दुःखद निधन झाले. ते 70 वर्ष वयाचे होते. त्यांच्या पश्चात भाऊ,भावजय, तीन मुले, एक मुलगी, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.पत्रकार दादासाहेब कदम यांचे ते वडील होते.

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बजेटचा जाहीर निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बजेटचा जाहीर निषेध पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०७/२०२४- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पंढरपूर तालुका व शहर च्या वतीने आज केंद्र सरकारने 2024/25 च्या काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्याने महाराष्ट्रातल्या कष्टकरी, कामगार,शेतकरी जनतेचा रोष पंढरपुरात अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून व्यक्त…

Read More

स्व.रतनचंद शहा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२३/०७/२०२४- स्व. रतनचंद शहा यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि.२५/७/२०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.२५/७/२०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता रक्तदान शिबीराचे श्री संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध भागात सकाळी ९.३० वा.वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता मुकबधीर विद्यालय, मंगळवेढा…

Read More

कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे

कृष्णा नदीचे वाहून जाणारे पाणी दक्षिण भागातील गावांना द्या- आ समाधान आवताडे आ आवताडे यांच्या मागणीवर कृष्णा-खोरे महामंडळाचा सकारात्मक प्रतिसाद मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०७/२०२४ – म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे कृष्णा नदीतील वाहून जात असलेले पाणी मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील १९ गावांना देण्याची मागणी मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यकारी संचालक पुणे यांच्याकडे…

Read More

अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले नियुक्ती आदेश- अँड.सुनिल वाळूजकर

महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमधील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा लाड बर्वे कमिटीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेली स्थगिती उठवली पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने औरंगाबाद खंडपीठाने अनुसूचित जातीमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत निर्णय घेतल्याने १४ सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिले नियुक्ती आदेश- अँड.सुनिल वाळूजकर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०७/२०२४- औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने अनुसूचित जातीमधील सफाई…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेत शिक्षण सप्ताहाचे आयोजन

द.ह.कवठेकर प्रशालेत शिक्षण सप्ताहाचे आयोजन प्रशालेतील मराठी,हिंदी, संस्कृत, इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित,विज्ञान विषय शिक्षकांनी आपल्या अध्यापनात शैक्षणिक साधनांचा परिपूर्ण वापर करून आजचा उपक्रम केला संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०७/२०२४- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत आज शासकीय आदेशानुसार शिक्षण सप्ताह उपक्रम साजरा करण्यास प्रारंभ झाला. आजच्या या उपक्रमात शालेय अभ्यासक्रमातील शैक्षणिक साधनांचे महत्त्व हा विषय प्रशालेचे…

Read More
Back To Top