आमदार अभिजित पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन

आमदार अभिजित पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.२७/०८/२०२५- दरवर्षीप्रमाणं याही वर्षी माढा चे आमदार अभिजित पाटील यांच्या घरी गणरायाचं आगमन झाले.कुटुंबियांसोबत भक्तीभावाने गणपती बाप्पाच्या मुर्तीची प्रथेप्रमाणे विधीवत प्राणप्रतिष्ठा करून पूजा आरती करण्यात आली. यावेळी सर्वांना सुख,समाधान,ऐश्वर्य,आनंद मिळावा तसेच बळीराजाची सर्व दुःखं, कष्ट दूर व्हावीत असे मागणे श्री गणरायाच्या चरणी आमदार अभिजित पाटील…

Read More

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत पर्यावरण स्नेही गणेशोत्सव

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत पर्यावरण स्नेही गणेशोत्सव पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत शाळेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पॉलिथिन मुक्त शाडूच्या मातीचे पुनर्चक्रीकरण अन डिस्पोजेबल वेस्टला नाही म्हणायला शिका आणि निर्माल्या पासून खत निर्मितीसाठी 2200 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.यात पॉलिथिन मुक्त गणेशोत्सव…

Read More

बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधवी कुसुमडे यांची बिनविरोध निवड

बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधवी कुसुमडे यांची बिनविरोध निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०८/२०२५ – बोहाळी ता.पंढरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार समाधान आवताडे गटाच्या माधवी कल्याण कुसुमडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीसाठी सरपंच शिवाजी पवार व ग्रामपंचायत अधिकारी श्री.म्हमाणे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.26 ऑगष्ट रोजी सभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी माधवी कल्याण कुसुमडे यांचा एकमेव…

Read More

शिवचातुर्य दिनाला शासनाची अधिकृत मान्यता

गरुडझेप मोहीम-शिवचातुर्य दिन या टपाल विशेष आवरणाने छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास जगभरात १७ ऑगस्ट १६६६ शिवचातुर्य दिनाला शासनाची अधिकृत मान्यता पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज – रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील, हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासातील सर्वाधिक महत्वाची आणि लक्षवेधी घटना म्हणजे महाराज आणि औरंगजेबाची आग्रा भेट आणि महाराजांची आग्र्याहून सुटका होय. छत्रपती…

Read More

गणेशोत्सव : सामाजिक ऐक्य,शुभेच्छा आणि स्त्री शक्तीचा संदेश…डॉ.नीलम गोऱ्हे

गणेशोत्सव : शुभेच्छा, सामाजिक ऐक्य आणि स्त्रीशक्तीचा संदेश… डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,दि.२६ ऑगस्ट २०२५ – गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील,देशभरातील आणि जगभरातील सर्व गणेश भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या,गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहेत.बालपणापासून बाप्पाशी असंख्य आठवणी जोडलेल्या असतात.आयुष्यातील अडचणींवर मात करण्याची हिंमत,यश मिळवण्याची शक्ती आणि मानसिक शांतता हीच…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०८/२०२५ – आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली.या मंगल प्रसंगी समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते गणेश पूजन व स्थापना विधी संपन्न झाला. गणेश पूजनावेळी समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच मंदिरे…

Read More

पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांची धरपकड

पंढरपुर शहर पोलीस ठाण्याच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पंढरपुर शहरातील गुन्हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांची धरपकड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०८/२०२५ –आज रोजी पंढरपुर उपविभागाचे सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से) व शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे उपस्थितीत गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले.यामध्ये सध्या पंढरपुरात बेकायदेशीरपणे कोयत्यासह फिरून दहशत पसरविणा-या गुन्हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर…

Read More

विरोधक दिशाभूल करत असले तरी महिलांचा आत्म सन्मान अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाची दिशा विरोधक दिशाभूल करत असले तरी महिलांचा आत्मसन्मान अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ ऑगस्ट २०२५ : दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभारग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या…

Read More

विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य सामुग्री आणि वृक्षारोपणाचा उपक्रम

प्रा.स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वाखरी ता.पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : माईर्स एमआयटी ग्रुपच्या विश्वस्त व महासचिव तसेच एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ आणि विश्वशांती गुरुकुलच्या कार्यकारी अध्यक्षा प्रा.स्वाती कराड-चाटे यांचा वाढदिवस एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वाखरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त स्कूलमध्ये महामृत्युंजय मंत्राचे पठण विद्यार्थ्यांनी केले तसेच विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनिअर…

Read More

तेलगाव व डोणगाव पुलाची पाहणी – खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाचे तातडीने उपाययोजनेचे आश्वासन

तेलगाव व डोणगाव पुलाची पाहणी – खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार बांधकाम विभागाचे तातडीने उपाययोजनेचे आश्वासन उत्तर सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२० ऑगस्ट २०२५ – खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या सूचनेनुसार उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील सीना नदीवरील पुलाची तसेच डोणगाव येथील नव्याने बांधलेल्या रस्त्यावरील पुलाची पाहणी करण्यात आली. अंत्रोळी, वडापूर,गुंजेगाव,अकोले मंद्रूप, शंकरनगर,तांडा, कंदलगाव आदी…

Read More
Back To Top