पंढरपुरात रविवारी मनसेची जाहीर सभा
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन : दिलीप धोत्रे
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.27/04/2024 – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात देशाचे पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाअट पाठिंबा जाहीर केला होता.यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांची दखल घेऊन आमचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विना अट पाठिंबा दिला आहे.मात्र त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
त्या अनुषंगाने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सायं.६ वाजता मनसेच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती मनसे राज्य नेते दिलीप धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सभेसाठी शिवसेना नेते राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत,माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा.राम सातपुते तसेच मनसेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून या सभेसाठी मतदार बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे राज्य नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या रविवार ता.28 रोजी पंढरपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या जाहीर सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन मनसेनेचे दिलीप धोत्रे यांनी केले आहे.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत शिरगीरे पाटील, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, पंढरपूर शहर संघटक गणेश पिंपळनेरकर आदी उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.