Remove Poverty दारिद्रय घालवण्‍यासाठी सोमवारी करा या मंत्राचा जप

[ad_1]

mahadev

पैशाच्‍या कमतरेअभावी अनेकवेळा जीवनात मानसिक-शारीरिक तणावाचे प्रसंग येतात. त्‍यामुळे मनुष्‍याचा आत्‍मविश्‍वास
देखील ढासळतो. अशावेळेस पैशाच्‍या कमतरतेपेक्षा त्‍यावेळेस उत्पन्‍न झालेल्‍या वाईट विचारांमुळे दारिद्रीपणात आणखी वाढ होते. त्‍यामुळे त्‍या व्‍यक्‍तीला उपेक्षा आणि अपमानाचा सातत्‍याने सामना करावा लागतो. अशा परिस्थितीतून वाचण्‍यासाठी व्‍यवहार आणि विचारांमध्‍ये बदल करण्‍याची गरज असते.

या परिस्थितीवर मात करण्‍यासाठीच्‍या धार्मिक उपायांमध्‍ये महादेवाच्‍या उपासनेचे महत्‍व पुराणात सांगितले आहे. ज्ञान, विवेक, तपाच्‍या रूपात शक्‍ती, संकल्‍प आणि पुरूषार्थाची प्रेरणा देण्‍याचे काम महादेव करतात. दारिद्रय दूर करण्‍यासाठी इथे सांगण्‍यात आलेल्‍या विशेष मंत्राने केलेली महादेवाची पूजा खूप प्रभावी मानली जाते.

सोमवारच्‍या दिवशी केलेली शिव उपासना ही शुभ्‍ा फळ देणारी असते.

सकाळी आंघोळीनंतर भगवान शंकर यांच्‍याबरोबर माता पार्वती आणि नंदीला पवित्र गंगा जल अर्पण करावे.

त्‍यानंतर महादेवांस चंदन, अक्षता, बिल्‍वपत्र, धोत-याचे फूल वाहावे. खाली दिलेले शिव मंत्र धन आणि पैशाविषयीच्‍या समस्‍या दूर करण्‍याच्‍या भावनेने म्‍हणावे.

मन्दारमालाङ्कुलितालकायै कपालमालांकितशेखराय।

दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम: शिवायै च नम: शिवाय।।

श्री अखण्डानन्दबोधाय शोकसन्तापहा​रिणे।

सच्चिदानन्दस्वरूपाय शंकराय नमो नम:॥

महादेवास तूप, साखर, गव्‍हाच्‍या पीठाने बनवलेला प्रसादाचा नैवेद्य दाखवावा. त्‍यानंतर आरती करावी.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top