क्रेडाई पंढरपूरच्या वतीने बांधकाम व्यावसायिकांसाठी चर्चासत्राचे आयोजन

पंढरपुरात भरणार क्रेडाई बांधकाम व्यवसायिकांचा मेळावा

क्रेडाई पंढरपूरच्या वतीने पंढरपूरमध्ये चर्चासत्राचे आयोजन

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१७ : देशातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना क्रेडाईच्या पंढरपूर शाखेच्या वतीने शनिवारी ता.१८ रोजी पंढरपूर मध्ये राज्यभरातील विविध शहरातील बांधकाम व्यावसायिकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील धनश्री हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रामध्ये लहान शहरातील बांधकाम व्यवसाय, त्यातील आव्हाने, समस्या व नवनवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती मिळणार आहे. अशा प्रकारचे नियोजन पंढरपुरातील बांधकाम व्यावसायिक मिळून प्रथमच करत आहेत. राज्यभरातून सुमारे वीस शहरातून शंभरहून अधिक बांधकाम व्यावसायिक, महाराष्ट्र सचिव विद्यानंद बेडेकर आणि पदाधिकारी यांच्यासह या चर्चासत्रामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी दिली आहे.

बांधकामातील अनावश्यक खर्चात कपात व संबंधित प्लॅनिंग यासंबंधीत मार्गदर्शन सांगलीचे आर्किटेक्ट रवींद्र चव्हाण हे करणार आहेत.

लहान शहरात मार्केटिंग कसे प्रभावी ठरेल यासाठी दिल्लीचे वक्ते अंकुर होरा मार्गदर्शन करणार आहेत.

रेरा व कार्पेट एरिया या संदर्भात दिलीप पाटील व मयूर शहा माहिती देणार आहेत.

या चर्चासत्राचे नियोजनसाठी सचिव मिलिंद देशपांडे, उपाध्यक्ष आशिष शहा, खजिनदार संतोष कचरे, सहसचिव शशिकांत सुतार, जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी तसेच युथ विंगचे सदस्य अंकित फत्तेपुरकर,क्षितिज शहा यांच्यासह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *