राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता देण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी

राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता देण्याची पत्रकार सुरक्षा समिती ची मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी

सोलापूर/ प्रतिनिधी- कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार माजला असून या महामारीला अटकाव व बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार,राज्य सरकार यांनी संचारबंदी ,लॉकडाऊन सारख्या प्रभावी अस्त्रांचा वापर करून राज्यातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना राज्यातील पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य यंत्रणांनी कोरोनाबाबत केंद्र सरकार ,राज्य सरकार चे सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेले आदेश ,सूचना राज्यातील युट्युब व वेब पोर्टल च्या पत्रकार व संपादकांनी राष्ट्रहित समजून आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी म्हणून जनजागृती बरोबरच कोरोनाबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.यात राज्यातील युट्युब व वेबपोर्टल च्या संपादक व पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून राज्यातील युट्युब व पोर्टल ला केंद्र सरकार व राज्य सरकार ची मान्यता नसल्याने पत्रकार विषयी असलेल्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने पत्रकार सुरक्षा समितीच्यावतीने राज्यातील युट्युब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता मिळावी म्हणून अनेक वेळा केंद्र सरकार व राज्य सरकार कडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करत असून पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री यांना युट्युब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता देण्यात यावी म्हणून स्मरणपत्र सोलापूर चे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले आहे. कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

   यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार,प्रदेश कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे ,प्रदेश उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे, शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी,राम हुंडारे,अक्षय बबलाद,श्रीकांत कोळी, सिद्धार्थ भडकुंबे ,भागप्पा प्रसन्न,श्रीनिवास गोरला, नागनाथ गणपा ,रोहित घोडके, सादिक शेख, अरुण सीडगिद्दी, नागमणी वग्गू, सतीश गडकरी, डी डी पांढरे, राजीव येलगुंटला आदी पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: