जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबईत चैत्यभुमी येथे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा फोटो जाळून केले निषेध आंदोलन- सिध्दार्थ कासारे
मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्याची अक्षम्य घोडचुक करणाऱ्या जितेद्र आव्हाड यांचा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आज मुंबईत चैत्यभुमी येथे जितेंद्र आव्हाड यांचा फोटो जाळुन तिव्र निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे कृत्य माफ करण्यासारखे नसुन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ; यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

मुंबई चैत्यभुमी येथे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश च्या वतीने स्टंटबाज जितेद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ तिव्र निषेध आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या नेतृत्वात जितेंद्र आव्हाड यांचे फोटो जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश माहातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ कासारे,महिला आघाडी मुंबई अध्यक्ष उषाताई रामळू, जिल्हाध्यक्ष संजय डोळसे,रमेश गायकवाड, संजय पवार,साधु कटके,हरिहर यादव,सोना कांबळे,रवि गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.