Omicron Variant: ‘ओमिक्रॉन’ सामान्य नाही! रुग्णसंख्येसहीत मृत्यूंच्या संख्येतही लक्षणीय वाढ


हायलाइट्स:

  • आठवड्याभरात जगभरातील रुग्णसंख्येत वाढ
  • रुग्णांच्या मृत्यूंतही वाढ
  • करोना विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटमुळे परिस्थिती चिंताजनक

वॉशिंग्टन, अमेरिका :

जगभरातील करोना रुग्णसंख्येच्या आकड्यात या आठवड्यात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येतंय. चिंताजनक म्हणजे, रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूंच्या संख्येतही जवळपास १२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आलीय.

‘एएफपी’च्या माहितीनुसार, या आठवड्यात दैनंदिन करोना रुग्णांची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढलीय. ही रुग्णसंख्या विक्रमी २.७८ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. या भयंकर परिस्थितीसाठी आणि आकडेवारीसाठी ‘ओमिक्रॉन‘ व्हेरियंट जबाबदार असल्याचं समोर येतंय.

यात, आशियामध्ये २१० टक्के, मध्य पूर्वमध्ये १४२ टक्के, लॅटिन अमेरिका-कॅरिबियन प्रदेशात १२६ टक्के आणि ओशिनियामध्ये ५९ टक्कं रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

अमेरिका आणि कॅनडामध्ये करोना रुग्णसंख्येत ३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येतंय. फिलिपिन्समध्येही रुग्णसंख्येत सर्वाधिक ३२७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आलीय. यानंतर भारतात ३२१ टक्के, कोसोवोमध्ये ३१२ टक्के, ब्राझीलमध्ये २९० टक्के आणि पेरूमध्ये २८४ टक्के वाढ झाली आहे.

Teenage Pregnancies: करोना काळात हजारो अल्पवयीन मुलींना ‘गर्भधारणे’मुळे सोडावी लागली शाळा!
Covid19: करोनापासून बचावासाठी कोणता मास्क सर्वोत्तम? तज्ज्ञांचा नागरिकांना सल्ला…
आफ्रिकन देशांत रुग्णसंख्या घसरतेय

उल्लेखनीय म्हणजे, याच दरम्यान दक्षिण आफ्रिका हा एकमेव देश आहे जिथे रुग्णसंख्येत घट झाल्याचं आणि परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं दिसून येतंय. इथे रुग्णसंख्येत ११ टक्के घट झाल्याचं समोर येतंय.

आफ्रिकन देशांमध्ये झपाट्यानं घटणाऱ्या रुग्णसंख्येवर नजर टाकली तर ‘इस्वातिनी’त सलग दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्येत सर्वात मोठी घट नोंदवण्यात आलीय. ही घट ४५ टक्के आहे. ३० टक्क्यांच्या घसरणीसह झांबिया दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेत २७ टक्के, नामिबियामध्ये २६ टक्के आणि यूकेमध्ये २५ टक्क्यांची घट झालीय. चार दक्षिण आफ्रिकन देशांना डिसेंबरच्या सुरुवातीला ओमिक्रॉन व्हेरियंटनं चांगलाच फटका दिला होता, तर यूके आणि युरोप गंभीरपणे प्रभावित झालेल्या देशांमध्ये होते.

Covid19: अमेरिकेतील रुग्णालये भरली, चाचण्यांचं प्रमाण दुप्पट करणार
Omicron Variant: ओमिक्रॉनला रोखण्यासाठी दोन मास्कचा वापर फायदेशीर? तज्ज्ञ म्हणतात…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: