मोदी सरकारकडून सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी:सिंगापूर दौऱ्यावर खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व

मोदी सरकारकडून सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी:सिंगापूर दौऱ्यावर खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व

नवी दिल्ली | प्रतिनिधी- संसद रत्न सुप्रीया सुळे Supriya Sule यांच्यावर मोदी सरकारने Modi government पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने सिंगापूर दौऱ्यावर जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत.

भारत आणि Singapore यांच्यात प्रस्तावित व्यापारी करारासंदर्भात उच्चस्तरीय चर्चा होणार असून या चर्चेत भारतीय संसदीय प्रतिनिधीमंडळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आले आहे.सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळात महाराष्ट्रातील नेतेही आहेत.

या शिष्टमंडळात महाराष्ट्रातील विविध पक्षांचे खासदार सहभागी आहेत. त्यामध्ये श्रीकांत शिंदे,प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांचा समावेश आहे. मात्र सिंगापूरला जाणाऱ्या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडेच असणार आहे.

इतर देशांसाठी स्वतंत्र शिष्टमंडळे

भारताच्या संसदीय डिप्लोमसी उपक्रमांतर्गत विविध देशांसाठी स्वतंत्र शिष्टमंडळांची नियुक्ती करण्यात आली आहे.

इंडोनेशियासाठी नेतृत्व –श्रीकांत शिंदे Shrikant Shinde
अर्जेंटिनासाठी – अशोक चव्हाण Ashok Chavan
ब्राझीलसाठी – प्रफुल्ल पटेल Praful Patel
मोरोक्कोसाठी – अरविंद सावंत Arvind Sawant
तसेच केनिया, चिली, बाल्टिक्स देशांसह इतर राष्ट्रांमध्येही खासदारांचे गट पाठवले जाणार आहेत.

विरोधी पक्षातील दिग्गजांचाही समावेश

या उपक्रमात विरोधी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये Shashi Tharoor शशी थरूर (फ्रान्स),पी चिदंबरम P. Chidambaram (इटली),के सी वेणुगोपाल K. C. Venugopal (पोर्तुगाल),मनीष तिवारी Manish Tewari (ऑस्ट्रेलिया), गौरव गोगोई Gaurav Gogoi (फिलिपिन्स) यांचा समावेश आहे.

तसेच कन्नीमोझी करूणानिधी Kanimozhi Karunanidhi (ग्रीस), डेरेक ओ ब्रायन Derek O’Brien (चिली), अभिषेक बॅनर्जी Abhishek Banerjee (अल्जेरिया), असादुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisi (ओमान), अखिलेश यादव Akhilesh Yadav (जपान), रामगोपाल यादव Ram Gopal Yadav (इजिप्त), संजय सिंह Sanjay Singh (कॅरिबियन देश) आणि एन के प्रेमचंद्रन N. K. Premachandran (मादागास्कर) यांच्याकडे संबंधित गटांचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.

संसदीय डिप्लोमसीला नवे बळ

मोदी सरकारकडून सर्वपक्षीय सहभागास प्राधान्य देत भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहे.संसद रत्न सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व सोपवणे हे त्यांच्या संसदीय अनुभवावर शिक्कामोर्तब मानले जात आहे.

भारताची संसदीय डिप्लोमसी अधिक प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Leave a Reply

Back To Top