कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


मुंबई,दि.8: कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या विभागाच्या विविध उपक्रम व योजनांच्या कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी,कार्यक्षम,सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्य युक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व विभागातील अधिकारी यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगार निर्मिती साठी प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत.राज्यातील युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल असेही ते म्हणाले.

गेल्या दोन वर्षात कौशल्य विकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू : कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की,कौशल्य विकास विभागा मार्फत गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले आहेत. कौशल्य युक्त व बेरोजगार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे.आजचा सक्षम युवा उद्याचा उज्वल महाराष्ट्र घडवणार आहे हे लक्षात घेऊन राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर,आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी,ग्रामीण भागात 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत.पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, विभागामार्फत रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थाना आर्थिक सहाय्य योजना,रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयातील अधिका-यांना प्रशिक्षण, करिअर विषयक साहित्य,डिजिटल अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना,मॉडेल करिअर सेंटर, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांशी सामंजस्य करार,आंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राच्या माध्यमातून परदेशात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे,आदिवासी उमेदवारांसाठी रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी,प्रशिक्षण व मार्गदर्शन,राज्यातील इच्छुक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading