वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धन हि लोकचळवळ व्हावी – राहुल केंद्रे

वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धन हि लोकचळवळ व्हावी – राहुल केंद्रे Arboriculture should be a people’s movement along with tree planting – Rahul kendre

लातूर -जिल्ह्यात मागील काळात पावसाचे प्रमाण अल्प झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती दुष्काळी परिस्थिती वर मात करायची असेल तर वृक्ष लागवडी बरोबर वृक्षांचे संगोपनाशिवाय तरणोपाय नाही म्हणून पुढील काळात वृक्ष लागवड करून लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करणे अशी लोक चळवळ उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून आजही ग्रामीण भागात पर्यावरण व आरोग्य जागृती अत्यंत महत्त्वाची असल्याचे व बाला या नाविण्यपुर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने शाळेचा भौतिक व गुणात्मक विकास करण्यासाठी लोकसहभाग म्हणून लोक वाटा देणा-यांचे दातृत्व कौतुकास्पद व इतर गावकं-यासाठी प्रेरणादायी आहे असे हिप्परगा ता उदगीर येथे वृक्षारोपणाच्या एका कार्यक्रमात बोलताना लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले.

लातूर जिल्हा परिषदेने 51 हजार वृक्षलागवडीच्या संकल्पनेस ग्रामीण भागातील युवा वर्गाकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून याचाच भाग म्हणून आज हिप्परगा येथे 500 चांगल्या प्रतीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिप्परगा गावचे सरपंच दिपक चव्हाण होते . संजयमामा पाटील उपसरपंच गणेश कानुरे,ग्रामसेवक गायकवाड मॅडम ,मुख्याध्यापक मनोज मुंढे,पाटील साहेब,डोंगरशेळकी केंद्राचे केंद्रप्रमुख एस पी मुंढे,डोंगरशेळकी चे माजी सरपंच ज्ञानोबा मुंढे,मारोती मुंढे,केंद्रे खेरडा येथील सरपंच,उपसरपंच,मधुकर बिरादार,गावातील पोलीस पाटील, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.

  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस पी मुंढे यांनी केले . सूत्रसंचालन ज्ञानोबा मुंढे यांनी तर आभार मनोजकुमार मुंढे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: