अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहा मध्ये होणार प्रदर्शित

अक्षय कुमारचा ‘बेलबॉटम’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित Akshay Kumar’s ‘Belbottom’ to hit theaters soon

मुंबई ,03/08/2021 – सुपरस्टार अक्षय कुमार बॉलिवूडमध्ये तसेच देशभरात अँक्शन आणि जबरदस्त फिटनेससाठी ‘खिलाडी’ या टोपण नावाने ओळखला जातो. तो वर्षातून तीन ते चार चित्रपट करतो. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे,अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा सतत पुढे ढकलाव्या लागत आहेत. अक्षय कुमारची सूर्यवंशी रिलीजसाठी सज्ज असून त्याचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

 अक्षय कुमार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट वरून ट्विट केले आहे, 'आज मुंबईत रक्षाबंधन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे.यात स्मृती श्रीकांत दिसतील.हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिलेली चित्रपटाची कथा त्यांची बहीण अलका हिरानंदानी यांना समर्पित केली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात भूमी पेडणेकर देखील दिसणार आहे.

अक्षय कुमारचा 'बेलबॉटम' चित्रपट लवकरच  चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.अक्षयने बच्चन पांडे, अतरंगी रे यांचेही शूटिंगही पूर्ण केले आहे. या चित्रपटात अक्षय आणि सारा व्यतिरिक्त साऊथ सिनेमाचा सुपरस्टार धनुषही यात दिसणार आहे. तर 'पृथ्वीराज चौहान' मध्ये अक्षय कुमार पृथ्वीराजच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार आणि आदित्य चोप्रा मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. माजी जागतिक सुंदरी मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: