बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

बेवारस मयताबाबत संपर्क साधण्याचे आवाहन

पंढरपूर दि.01:-दि. 30 मार्च 2024 रोजी एक अनोळखी व्यक्ती कोल्हापूर – कलबुर्गी या चालत्या रेल्वे गाडीत बसण्याचा प्रयत्न करत असताना रेल्वे गाडी खाली येवून दोन्ही पाय मांडीपासून निकामी झाले.सदर व्यक्तीस उप जिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारा साठी दाखल केले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधवा असे, आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.

या मयत व्यक्तीकडे आधार कार्ड मिळून आले असून त्यावरती सौदागर भिमराव क्षिरसागर असे नाव आढळून आले आहे. संबधित कार्डवरती असलेल्या पत्त्याच्या ठिकाणी चौकशी केली असता सदर व्यक्ती या ठिकाणी राहत नसल्याचे सांगण्यात आले आहे.या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्षे असून उंची 168 सें.मी,बांधा मजबूत,रंगाने सावळा, केस काळे,अंगात पांढऱ्या रंगाचा चौकाडा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे.

संबंधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने याबाबत पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *