चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०७/२०२४ – वेणूनगर गुरसाळे ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान , रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महारोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नियोजित दौरा पुढील प्रमाणे –
गुरुवार,दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी ०९:०० वाजता पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्री संत नामदेव पायरी येथे महाआरती होणार आहे.
सकाळी ०९:३० वाजता माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यक्रमासाठी उपस्थिती असणार आहे.
सकाळी १०:३० वाजता अरण ता.माढा येथील श्री संत सावता माळी मंदीरात दर्शन घेतले जाणार आहे.
सकाळी ११:०० वाजता माढा येथील माढेश्वरी मंदिर दर्शन घेतले जाणार आहे.
दुपारी ०२:०० वा पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे.
दुपारी ०४:०० वाजता मंगळवेढा येथील संत दामाजीपंत मंदीर, जय भवानी मंदीर, संत चोखामेळा समाधी, पिरसाहेब दर्गा येथे दर्शन घेतले जाणार आहे .
त्यानंतर सायं.०७:०० वाजता पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात चेअरमन अभिजीत पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.