महामार्गावर धोकादायक स्थितीत उभे असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरीता विषेश मोहिम

महामार्गावर धोकादायक स्थितीत उभे असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरीता विषेश मोहिम Special operation to take action against vehicles parked in dangerous condition on highway
   पुणे, 20/09/2021 - राष्ट्रीय महामार्ग/ राज्य महामार्ग येथे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरूध्द कारवाई पुणे ग्रामीण हद्दीतुन जाणारे पुणे - सातारा , पुणे - मुंबई ( जुना व नविन ) ,पुणे - सोलापूर , पुणे - नाशिक , कल्याण - जबलपुर ,पुणे - पंढरपुर (सासवड जेजुरी मार्गे) , पुणे - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गवर मागील सहा महिन्यात प्राणांकीत व गंभीर स्वरूपाचे अपघात झालेले आहेत . सदर अपघाताचे कारणामध्ये प्रमुख कारण हे रस्त्यावर उभे केलेल्या वाहनास पाठीमागून धडकून अपघात आहेत .त्यात मृत्युचे प्रमाण जास्त आहे . त्या प्राणांकित व गंभीर अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी दिनांक १०/ ०९/२०२१ ते दिनांक १६/०९/२०२१ या कालावधीत वर नमुद प्रमुख महामार्गावर धोकादायक स्थितीत उभे असणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा अन्वये दंडात्मक कारवाई करण्याकरीता विषेश मोहिम राबविण्यात आली . 

 सदरची मोहिम पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण , अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील ,पुणे विभाग व अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा व पोलीस अंमलदार वाहतुक शाखा व पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण स्तरावर राबविण्यात येत आहे  तसेच यापुढेही वर नमुद महामार्गावर धोकादायक स्थितीत उभे असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक , पुणे ग्रामीण , यांनी निदेश दिलेले आहेत .

वास्तविक अनेक वाहनांना पाठीमागील भागात रिफ्लेक्टर्स नसतात अथवा पार्किंग लाईट नसतात. समोरून येणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात ही बंद वाहने तसेच रस्त्यावर बंद पडलेल्या वाहनांसाठी लावलेले अडथळे दिसत नाहीत . वेगातील वाहनांना एकदम कंट्रोल करणे अशक्य होऊन बसते. रात्री जाणारी खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसना मोठे दिवे बसवलेले असतात त्यांच्या फोकसमुळे समोरील वाहनचालकाला काहीही दिसत नाही. कित्येक वर्षांपासून ही तक्रार असूनही यावर कोणतीही कारवाई केली जात नाही त्यामुळे रात्रीच्या वाहन अपघातात मोठी वाढ झाली आहे.यासाठी आता केंद्रीय स्तरावर देखिल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून दखल घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: