लाडकी बहीण सन्मान यात्रा व भव्य रोजगार मेळाव्याचे गोवंडीत आयोजन
महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे, वेळ आली तर महिलांनी स्त्रीशक्तीचा दणका दाखवला पाहिजे – डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज, २५ ऑगस्ट – शिवसेनेच्या शिव उद्योग संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान यात्रा व तसेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईच्या गोवांडीतील विठू माऊली गोल्डन बँक्वेट हॉल येथे आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.माजी आमदार तुकाराम काते यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमांत डॉ.नीलम गोऱ्हे यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील हे सरकार नारी शक्तीचां सन्मान करणार सरकार असल्याचे यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

महिलांच्या खात्यावर पैसे आल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखत आहे, अशी टीका यावेळी काते यांनी कार्यक्रमात बोलताना केली.
यावेळी कार्यक्रमात बोलताना डॉ.गोऱ्हे यांनी महिलांनी स्वतःचे रक्षण स्वतः केले पाहिजे असे सांगितले, तसेच महिलांनी जर का ठरवलं तर त्या तिथल्या तिथे स्त्रीशक्तीचा दणका देऊ शकतात, हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी महिलांना सांगायचे की महिलांनी त्यांच्या पर्स मध्ये तिखटाचे पुडे ठेवावे…अशी आठवण देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितली व मा. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत असल्याचे ना.नीलम गोर्हे म्हणाल्या .
पूर्वीच्या चेंबूर मध्ये आणि आताच्या चेंबूर मध्ये फार बदल झाला असून, चेंबूरमधील महिला आर्थिक सक्षम झाल्याचे दिसत आहे,अशी आठवण देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितली.एखाद्या महिलेला कोणी त्रास देत असेल किंवा त्या महिलेची छेड काढत असेल तर 112 व 1098 या हेल्पलाईन वर संपर्क करण्याचे आवाहन यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी उपस्थित महिलांना केले.

तसेच जे काँग्रेस लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहे, त्या काँग्रेस सरकारने 2004 साली कशी जनतेची फसणूक केली केली होती यासंदर्भात किस्सा यावेळी सांगितला, व काँग्रेस हा विश्वास ठेवण्यासारखे पक्ष नाही असा आरोप यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी केला.
याप्रसंगी राहुल शेवाळे (माजी खासदार), तुकाराम काते ( माजी आमदार),अविनाश राणे (विभागप्रमुख), सौ.समृध्दी काते (नगरसेविका), सौ.कामिनी शेवाळे (संपर्कप्रमुख महिला), दीपक काळीद (अध्यक्ष शिवउद्योग समिती), सौ.सुनीता वैती, प्रकाश ओवळ, भास्कर चव्हाण, रवींद्र महाडिक यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

