स्वस्त कर्जाचा परिणाम; सात प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री दुपटीने वाढली


हायलाइट्स:

  • जुलै-सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली.
  • या काळात ६२,८०० युनिट्सची विक्री झाली.
  • वर्षभरापूर्वी याच तिमाहीत २९५२० युनिट्सची विक्री झाली होती

नवी दिल्ली : गृहकर्जाचे कमी दर आणि आयटी तसेच आयटीशी संबंधित सेवा (ITeS) क्षेत्रातील कामांचा घर खरेदी-विक्रीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. जुलै-सप्टेंबर २०२१ च्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली आणि ६२,८०० युनिट्सची विक्री झाली. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत २९५२० युनिट्सची विक्री झाली होती आणि एप्रिल-जून २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत देशातील सात प्रमुख शहरांमध्ये २४५६० घरे विकली गेली होती.

सेन्सेक्स -निफ्टीत मोठी पडझड ; सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांना बसला शॉक
एनारॉक (Anarock) चा हा अहवाल दिल्ली-एनसीआर, मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर), चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे येथील घरांच्या विक्रीवर आधारित आहे. अहवालानुसार, घरांच्या किमतीतही ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि एप्रिल-जून २०२१ च्या तिमाहीत, त्याच्या किमती गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत ५६०० चौरस फुटांवरून ५७६० चौरस फुटांवर गेल्या.

शेअर बाजारात मोठी घसरण; टाटा पॉवरचे शेअर्स तेजीत, जाणून घ्या कारण
या कारणांमुळे घरांची विक्री वाढली
– एनारॉकचे प्रमुख अनुज पुरी यांच्या मते, आयटी आणि आयटीईएस क्षेत्रातील वाढीमुळे देशातील सात प्रमुख शहरांमध्ये घरांच्या मागणीत वाढ झाली आहे.
– नोकरीची सुरक्षा, आयटी/आयटीईएस आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये भरतीव्यतिरिक्त, गृह कर्जाचे दर विक्रमी कमी झाल्याने घरांच्या मागणीत वाढ झाली आहे.
– तसेच, स्वतःचं घर घ्या, ही भावना दृढ झाल्यामुळे घरांची विक्री वाढली आहे.
– घरून काम करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागल्यामुळे (WFH) एकूणच घरांची मागणी आणि युनिट साईज यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींवर परिणाम झाला.
– तसेच लसीकरणाच्या जलद गतीमुळेही साइट व्हिजिटचे प्रमाण वाढले आहे.

ऑक्टोबरपासून ATM सेवा बंद; या बँंकेने घेतला निर्णय, हे आहे त्यामागचे कारण
जुलै-सप्टेंबर २०२१ मध्ये इतक्या घरांची विक्री

शहर जुलै-सप्टेंबर २०२० जुलै-सप्टेंबर २०२१ विक्रीत तेजी
दिल्ली-एनसीआर ५२०० युनिट्स १०२२० युनिट्स ९७%
MMR ९२०० युनिट्स २०९६५ युनिट्स १२८%
बेंगळुरू ५४०० युनिट्स ८५५० युनिट्स ५८%
पुणे ४८५० युनिट्स ९७०५ युनिट्स १००%
हैदराबाद १६५० युनिट्स ६७३५ युनिट्स ३०८%
चेन्नई १६०० युनिट्स ३४०५ युनिट्स ११३%
कोलकाता १६०० युनिट्स ३२२० युनिट्स १०१%

२०२१ मध्ये घरांच्या विक्रीत ३० टक्के वाढ अपेक्षित
याआधी, एनारॉकने देशातील सात प्रमुख शहरांमध्ये १,७९,५२७ घरांच्या विक्रीचा अंदाज वर्तवला होता आणि वर्षाला ३० टक्क्यांची वाढ नोंदवली होती. गेल्या वर्षी २०२०मध्ये १,३८,३४४ घरांची विक्री झाली. कोरोना महामारीबद्दल बोलायचं झालं तर २०१९ मध्ये देशातील सात प्रमुख शहरांमध्ये २,६१,३५८ घरे विकली गेली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: