coronavirus updates करोना: राज्यात आज ३ हजारांवर नवे रुग्ण, मृत्यूंच्या संख्येत किंचित वाढ


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ०६३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३ हजार १९८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ५६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. तसेच राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्याही थोडी कमी झाली आहे. मात्र, असे असले तरी आज करोना बाधित मृतांच्या सख्येत वाढ झाल्याने स्थिती चिंताजनक आहे. तसेच कालच्या तुलनेत आज बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ०६३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार १८७ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार १९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ३ हजार २५३ इतकी होती. तर, आज ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती. (maharashtra registered 3063 new cases in a day with 3198 patients recovered and 56 deaths today)

आज राज्यात झालेल्या ५६ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ७१ हजार ७२८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के इतके झाले आहे.

मुंबईतल्या अंधशाळेतून नव्या अंध मत्स्यकुळातील प्रजातीचा शोध; संशोधकांमध्ये तेजस ठाकरेंचा समावेश

अशी आहे सक्रिय रुग्णांची स्थिती!

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३६ हजार ४८४ इतकी आहे. काल ही संख्या ३६ हजार ६७५ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा ९ हजार ३९६ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या ६ हजार १९६ आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ५ हजार ०५९ अशी वाढली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या २ हजार ०८३ वर आहे. तर, सांगलीत एकूण १ हजार ११९ आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या १ हजार ३६१ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘तिबोटी खंड्या’ हा रायगड जिल्ह्याचा पक्षी घोषित; भूतान, श्रीलंकेतून येतो जिल्ह्यात

मुंबईत उपचार घेत आहेत ५,१८३ रुग्ण

मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार १८३ इतकी आहे. तर, रत्नागिरीत ६३६ इतकी आहे आहे, सिंधुदुर्गात ६७२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८७४ इतकी खाली आली आहे.

भंडारा जिल्ह्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण

या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४००, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १०४ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या १०९ वर आली आहे. तर धुळ्यात ३ आणि भंडाऱ्यात सर्वात कमी म्हणजेच २ सक्रिय रुग्ण आहेत.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेले

२,४५,४२७ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८७ लाख ३९ हजार ९७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ५० हजार ८५६ (११.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४५ हजार ४२७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ४२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: