सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने विमुक्त दिनी माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस अभिवादन

सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने विमुक्त दिनी माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन

सोलापूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०८/२०२४ – ३१ ऑगस्ट १९५२ हा दिवस भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा दिवस याच दिवशी भारताचे तत्कालीन स्व. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे देशभरातील भटक्या- विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून व त्यांना बंदिस्त केलेल्या कुंपणाच्या तारा सोलापुरात स्वतःच्या हाताने तोडून अमानवी कायद्यातून मुक्त केले. त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे,सोलापूर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या हस्ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला.

यावेळी भटक्या विमुक्त विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव , जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे ,डी ब्लॉक अध्यक्ष देविदास गायकवाड,सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे ,मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, नागेश म्हेत्रे, गिरीधर थोरात, ज्ञानेश्वर जाधव, अंजली मंगोडेकर, लखन गायकवाड, परशुराम सातारेवाले, राजेश झंपले,नूरअहमद नालवार, धीरज थोरात,विवेक कन्ना, संजु गायकवाड, सुभाष वाघमारे ,धीरज खंदारे ,संजय गायकवाड,मल्लेश सूर्यवंशी,दीपक नंदुरकर, भीमा बंडगर, मोहसीन फुलारी,संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top