१ ऑक्टोबरपासून बदलणार सहा नियम; जाणून घ्या सविस्तर


हायलाइट्स:

  • नवीन नियम लागू केल्यानंतर बँकिंग, शेअर बाजार आणि पगार-पेन्शनशी संबंधित कामे करण्याच्या पद्धतीत बदल होईल.
  • याशिवाय, बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ऑटो डेबिटसाठी ग्राहकांची मान्यता घ्यावी लागणार आहे.
  • तीन बँकांचे चेकबुक उद्यापासून इतिहासजमा होणार आहे.

नवी दिल्ली : आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या १ ऑक्टोबरपासून नागरिकांसाठी अनेक महत्वाच्या गोष्टी बदलतील. याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होईल. नवीन नियम लागू केल्यानंतर बँकिंग, शेअर बाजार आणि पगार-पेन्शनशी संबंधित कामे करण्याच्या पद्धतीत बदल होईल. ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळवण्यासाठी लिव्हिंग सर्टिफिकेट डिजिटल स्वरूपात सादर करण्याची सुविधा मिळेल. याशिवाय, बँका आणि इतर वित्तीय संस्थांना ऑटो डेबिटसाठी ग्राहकांची मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच तीन बँकांचे चेकबुक उद्यापासून इतिहासजमा होणार आहे. १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या महत्त्वाच्या बदलांबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

सोन्याचा भाव तेजीत ; जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने
पेन्शन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल
१ ऑक्टोबरपासून ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पेन्शनधारकांना डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा मिळेल. देशभरातील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रधान केंद्रांमध्ये ते जमा करता येईल. जीवन प्रमाणपत्र हा निवृत्तीवेतनधारक जिवंत असल्याचा पुरावा आहे. उर्वरित पेन्शनधारक १-३० नोव्हेंबरपासून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील.

पुन्हा उडाला इंधन भडका ; भोपाळमध्ये पेट्रोल ११० रुपयांवर , डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर
तीन बँकांची चेकबुक होणार इतिहासजमा
अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये तुमचे बँक खाते असल्यास सावधगिरी बाळगा. कारण या तीन बँकांचे चेकबुक आणि एमआयसीआर कोड १ ऑक्टोबरपासून अवैध ठरणार आहे. अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली आहे. हे विलीनीकरण १ एप्रिल २०२० पासून करण्यात आले आहे. तसेच ओबीसी आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत १ एप्रिल २०१९ पासून विलीनीकरण करण्यात आले.

मंत्रिमंडळाने दिली प्रस्तावाला मंजुरी; ‘या’ सरकारी कंपनीचा येणार आयपीओ
ऑटो डेबिटचा नियम बदलणार
१ ऑक्टोबरपासून ऑटो डेबिटचा नवा नियम लागू होणार आहे. याअंतर्गत, बँका आणि इतर वित्तीय संस्थांना प्रत्येक वेळी ग्राहक किंवा वापरकर्त्यांकडून ५ हजार रुपयांपेक्षा अधिक देणे किंवा बिल भरण्यासाठी मंजुरी घ्यावी लागणार आहे. पूर्वी एका ठराविक तारखेला बँक किंवा मोबाईल वॉलेट खात्यातून आपोआप पैसे कापले जात असे आणि त्याचा संदेश ग्राहकांना मिळत असे.

केवायसी अपडेट न झाल्यास डीमॅट खाते बंद होणार
जर तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुमच्याकडे डिमॅट खाते देखील असेल. जर तुम्ही त्याचे केवायसी अपडेट केले नसेल, तर ते आजच अपडेट करून घ्या. नाहीतर उद्या १ ऑक्टोबरपासून तुमचे डीमॅट खाते बंद होऊ शकते. भांडवली बाजार नियामक सेबीने यापूर्वी ३० जुलै २०२१ पर्यंत वेळ दिला होता, जो पुढे ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला. जर डीमॅट खाते बंद झाले, तर तुम्हाला शेअर बाजारात व्यापार करता येणार नाही. या व्यतिरिक्त, जर तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील, तर ते केवायसी पूर्ण होईपर्यंत डीमॅट खात्यात हस्तांतरित केले जाईल.

स्वस्त कर्जाचा परिणाम; सात प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री दुपटीने वाढली
नामनिर्देशित व्यक्तीचा उल्लेख आवश्यक
उद्यापासून उघडल्या जाणाऱ्या सर्व डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांसाठी नामनिर्देशित व्यक्तीचा उल्लेख करणे आवश्यक करण्यात आलं आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराला खाते उघडताना नामनिर्देशित व्यक्तीचा उल्लेख करायचा नसेल, तर त्याला याबाबत जाहीरनामा (डिक्लेरेशन फॉर्म) भरून खुलासा करावा लागेल. याशिवाय, जुन्या डिमॅट आणि ट्रेडिंग खातेधारकांना, ज्यांनी नामनिर्देशित व्यक्तीचा उल्लेख केला नाही, त्यांना पुढील वर्षी २२ मार्च २०२२ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. जर त्यांना तसे करायचे नसेल, तर त्यांना डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागेल. असे न करणाऱ्या गुंतवणूकदारांची ट्रेडिंग आणि डीमॅट खाती गोठविली जातील.

पगाराच्या १० टक्के म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक
म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवूदारांचे हित लक्षात घेऊन सेबीने म्युच्युअल फंड हाऊसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम जारी केला आहे, जो उद्यापासून लागू होईल. या नियमानुसार, अॅसेट अंडर मॅनेजमेंट कंपनी म्हणजे म्युच्युअल फंड हाऊसच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण पगाराच्या १० टक्के हिस्सा म्युच्युअल फंड युनिटमध्ये गुंतवावा लागेल. हा नियम टप्प्याटप्प्याने अंमलात आणला जात आहे आणि १ ऑक्टोबर २०२३ पासून ही गुंतवणूक २० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: