देवेंद्र फडणवीसांचा मराठवाडा दौरा, तर पंकजा मुंडे आजारी; राजकीय चर्चेला उधाण


हायलाइट्स:

  • देवेंद्र फडणवीस आजपासून मराठवाडा दौऱ्यावर
  • वाशिम जिल्ह्यातून पाहणी दौरा सुरू करणार
  • पंकजा मुंडे गैरहजर राहणार असल्याच्या चर्चा

औरंगाबादः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे आजपासून पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम जिल्ह्यातून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मराठवाडा दौऱ्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) उपस्थित राहणार नसल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे उपस्थित असणार हे निश्चित मानलं जातं होतं. मात्र, पंकजा मुंडे यांनी आपण आजारी असल्याचं म्हटलं आहे. फडणवीस यांच्या दौऱ्याआधी पंकजा यांनी ट्वीट करत आपली तब्येत ठीक नसल्याचं म्हटलं आहे. तसंच, पुढील दोन दिवस आराम करणार असल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे.

वाचाः किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढणार?; न्यायालयाने बजावले समन्स

पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या घशात फोड आले असून त्यांना डॉक्टरांनी त्यांना चार दिवस बोलणं टाळण्याचा सल्ला दिला आहे. मुंडे यांना घशामध्ये फोड तसेच टॉन्सिल्सचाही त्रास सुरु झाला आहे. त्यामुळं पुढील चार दिवसांत पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉल स्वीकारणार नाहीत. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीपासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यानही या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दौऱ्याची घोषणा आणि पंकजा मुंडे यांचे आजारी पडणं यामुळं राजकीय तर्कवितर्क बांधले जात आहे.

वाचाः ‘राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली?’

दरम्यान, गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने पिकांचे आतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला असून राज्य सरकारकडे ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी होत आहे. राज्याते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आजपासून मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. वाशिममधून ते तीन दिवसीय पाहणी दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

वाचाः रविवारी लोकल प्रवास करताय? मग ही बातमी आधी वाचाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: