lakhimpur kheri : यूपीत लखीमपूर-खेरीमध्ये हिंसाचार; ५ शेतकऱ्यांचा मृत्यू? तणावाचं वातावरण


लखनऊः यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील कथित कारच्या अपघातावरून मोठा राडा झाला आहे. अपघातानंतर शेतकरी संतप्त ( violence in up’s lakhimpur-kheri ) झाले आहेत. अपघातात ५ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तेथील परिस्थिती अतिशय तणावपूर्ण आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय किसान युनियनने शेतकऱ्यांना लखीमपूरमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे. लखीमपूरमध्ये हजारो शेतकरी आधीच दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्र टेनी यांचे पुत्र अभय मिश्र मोनू यांनी शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होतोय. काही शेतकरी संघटनांनी तर गोळीबार झाल्याचाही आरोप केला आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांच्या समर्थकांच्या कारला धडकल्याने दोन शेतकरी जखमी झाले, असं आधी सांगण्यात येत होतं. या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी दोन गाड्या पेटवल्या. ज्या दोन गाड्या शेतकऱ्यांनी पेटवल्या त्यातील एक कार ही केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाची आहे, असं बोललं जातंय. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या उद्या लखीमपूर खेरीला भेट देण्याची शक्यता आहे.

हा नरसंहार पाहून जो कोणी गप्प आहे, समजून घ्या तो आधीच मेला आहे. पण आम्ही शेतकऱ्यांचे हे बलिदान व्यर्त जाऊ देणार नाही. किसान सत्याग्रह जिंदाबाद!, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

shahrukh khan son aryan khan detained : क्रूझवर रेव्ह पार्टी; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांची NCB कडून चौकशी

भाजप देशातील शेतकऱ्यांचा किती द्वेष करते? त्यांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांनी आवाज उठवला, तर तुम्ही त्यांना गोळ्या घालणार का, तुम्ही गाडीखाली तुडवाल का? हे खूप झालं. हा शेतकऱ्यांचा देश आहे, भाजपच्या क्रूर विचारसरणीची जहागिरी नाही. शेतकऱ्यांचा सत्याग्रह आणखी बळकट होईल आणि शेतकऱ्याचा आवाज आणखी मोठा होईल, असं प्रियांका गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

mamata banerjee : अखेर ममता बॅनर्जींची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचली; भवानीपूर पोटनिवडणूक जिंकली

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या रक्ताची इतकी तहानलेली झाली आहे, की देशाच्या गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाने लखीमपूर खेरीमध्ये अनेक शेतकऱ्यांना आपल्या कारने निर्दयीपणे चिरडले. कर्नाल ते लखीमपूर खेरीपर्यंत. तुमची सत्ता ‘रक्तरंजित नंगा नाच’ केला आहे. हे फोटो भीषण आहेत, पण भाजपचे सत्य दाखवणारे आहेत, असं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: