Lakhimpur Kheri violence: शेतकऱ्यांना चिरडलं, मंत्रीपुत्र आशिष मिश्रा विरुद्ध गुन्हा दाखल


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागात हिंसाचार
  • हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू
  • मंत्रीपुत्र आशिष मिश्रा याच्याविरोधात कलम ३०२२, १२० बी आणि इतर कलमांसहीत एफआयआर दाखल
  • दोषींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार नाही, शेतकऱ्यांची भूमिका

लखीमपूर खीरी, उत्तर प्रदेश : ‘जेव्हापर्यंत दोषीला अटक होत नाही तेव्हापर्यंत लखीमपूर खीरीमध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार नाहीत’, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. यापूर्वी लखीमपूर प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी १४ जणांविरोधात एक एफआयआर दाखल केली आहे. मात्र, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांची अटकेची मागणी

उत्तर प्रदेशत पोलिसांकडून कलम ३०२२, १२० बी आणि इतर कलमांसहीत ही एफआयआर दाखल करण्यात आलीय. रविवारी, लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्रीपुत्र आशिष मिश्रा यानं आंदोलकांना आपल्या गाडीखाली चिरडल्याचा आरोप करण्यात येतोय. या हिंसेत चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले आहेत. यानंतर दोषींना अटक करण्यात यावी, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.


lakhimpur kheri : यूपीत लखीमपूर-खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडलं? तणावाचं वातावरण
shahrukh khan son aryan khan detained : क्रूझवर रेव्ह पार्टी; शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांची NCB कडून चौकशी

मंत्र्यांकडूनही एफआयआर दाखल

दुसरीकडे, भाजप मंत्र्यांकडूनही पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. ‘काही शेतकरी शांतीपूर्ण पद्धतीनं विरोध प्रदर्शन करत असल्याची सूचना आम्हाला मिळाला होती. त्यामुळे आम्ही रस्ता बदलला. याच दरम्यान, शेतकऱ्यांत लपलेल्या काही अराजक तत्त्वांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या घटनेचा एक व्हिडिओही आमच्याकडे आहे’, असं केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांनी या घटनेबद्दल म्हटलंय.

दरम्यान, या घटनेच्या राजकारणालाही सुरूवात झालीय. लखीमपूरला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तसंच आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनाही पोलिसांनी चेकिंग दरम्यान रोखण्यात आलंय.

navjot singh sidhu : नवज्योत सिंग सिद्धू बोलले, ‘… तर आपण तोंड दाखवण्या लायक राहणार नाही’
ashok gehlot : मुख्यमंत्री गहलोत यांचा भाजप, RSS वर निशाणा; म्हणाले, ‘महात्मा गांधीजींचे नाव…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: