धोनीच्या निवृत्तीवर CSK ने दिलं मोठं अपडेट; वाचा सविस्तर बातमी


चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत धोनी पहिल्यांदाच बोलला आहे. आपला शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत खेळणार असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे आगामी हंगामात धोनी यलो जर्सीमध्ये खेळताना दिसणार ही गोष्ट पक्की झाली आहे. २०१९ पासून धोनीने चेन्नईमध्ये आयपीएलचा सामना खेळलेला नाही. ‘इंडिया सिमेंट्स’च्या ७५ व्या वर्षानिमित्त चाहत्यांशी बोलताना धोनी म्हणाला की, ‘निवृत्तीचा सामना पाहायला तुम्ही सर्वजण येऊ शकता आणि मला सीएसके कडून खेळताना पाहू शकता. हा माझा शेवटचा सामना असेल. तुम्हा सर्वांना मला निरोप देण्याची संधी मिळेल. आशा आहे की, आम्ही चेन्नईमध्ये खेळू आणि तिथेच चाहत्यांना भेटू.’

वाचा- Video: ९ कोटी २५ लाखाच्या खेळाडूला साधा कॅच घेता आला नाही, विजय मिळवणाऱ्या…

क्रिकबझ वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, इंडिया सिमेंटच्या एका अधिकाऱ्याने धोनीच्या वक्तव्याची पुष्टी केली. आयपीएल २०२२ चा हंगाम धोनीसाठी शेवटचा हंगाम असेल का याबाबत त्याने बोलणे टाळले. धोनी सध्या कुठेही जाणार नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी म्हणाले की, ‘आम्ही त्याला संघात कायम ठेवू. तो पुढच्या वर्षी संघात असेल आणि कुणास ठाऊक तो आणखी काही वर्षे खेळेल. अद्याप काहीही ठरवले गेले नाही आणि त्याने फक्त एवढेच सांगितले आहे की, चाहते त्याचा निरोपाचा सामना चेन्नईत पाहू शकतात. पण पुढच्या वर्षी तो शेवटचा सामना खेळेल, हे यावरून समजू नये.’

वाचा- IPL मध्ये भारतीय क्रिकेटपटू ढसाढसा रडला, राशिद खानने शेअर केला व्हिडिओ

धोनीला संघात कायम ठेवले जाईल
४० वर्षीय धोनीने अजूनही आयपीएल किंवा चेन्नई सुपर किंग्ज सोडण्याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. चेन्नईची फ्रँचायझीही त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे. फ्रँचायझीकडून असे म्हटले गेले आहे की, ते पुढील वर्षीच्या लिलावात धोनीला कायम ठेवतील. सूत्रांचा विश्वास आहे की, सीएसके पुढील लिलावासाठी कर्णधार धोनी, अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड या तीन खेळाडूंना संघात कायम ठेवेल.

वाचा- षटकार मारून विजय मिळून देणारा आता बॅटिंग विसरला; ‘सुपर स्लो’ फलंदाजीवर चाहते…

सध्या बीसीसीआयने रिटेन्शन पॉलिसी जाहीर केलेली नाही, पण यापूर्वीच्या मेगा लिलावात फक्त तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत चेन्नई फ्रँचायझीकडून असे सांगितले जात आहे की, पुढच्या वर्षी नवीन टीम बनवण्यात धोनी महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचा निर्णय २०२२ नंतरच येऊ शकतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: