Lakhimpur Kheri : राहुल आणि प्रियांका गांधी लखीमपूरमध्ये मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटले; बोलले…
lakhimpur kheri : लखीमपूर हिंसाचाराची सुप्रीम कोर्टाने घेतली दखल, उद्या होणार सुनावणी
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री पालिया तहसील गाठले. रविवारी झालेल्या हिंसाचारात मृत्यू झालेल्या ४ शेतकऱ्यांपैकी एक मृत लवप्रीत सिंगच्या कुटुंबाची भेट घेतली. राहुल गांधी चौखरा फार्म येथील शेतकऱ्याच्या घरी पोहोचले. तिथे ते शोककुल कुटुंबाशी बोलले आणि तीव्र शोक व्यक्त केला, असं काँग्रेस सूत्रांनी सांगितलं. शिष्टमंडळात काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळात काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुडाही आहेत.
rahul gandhi reaches lakhimpur kheri : राहुल गांधी आणि प्रियांका गांधी लखीमपूर खिरीत दाखल