सेन्सेक्स-निफ्टी सुस्साट! ‘या’ गोष्टी ठरवणार भांडवली बाजाराची पुढील दिशा


हायलाइट्स:

  • बड्या कोर्पोरेट्सकडून तिमाही निकाल जाहीर केले जाणार आहेत.
  • करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेत ९३ कोटी डोस पूर्ण झाले आहेत.
  • भारत करोनाची तिसरी लाट रोखण्यास यशस्वी होईल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटतोय.

मुंबई : नुकताच रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर झाले. यात बँकेने व्याजदर स्थिर ठेवले असले तरी जीडीपीबाबत आश्वासक असल्याचे म्हटलं आहे. करोना संकट आणि देशात सुरु असलेली व्यापक लसीकरण मोहीम यातूनही अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरु आहे. नव्या आठवड्यात बड्या कोर्पोरेट्सकडून तिमाही निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

बिटकॉइनची वाटचाल रेकॉर्डच्या दिशेने ; जाणून घ्या आज कितीने महागले डिजिटल करन्सी
नव्या आठवड्यात गुंतवणूकदार तिमाही निकालांवर लक्ष देतील. यात आयटी क्षेत्राच्या कामगिरीकडे नजरा असतील, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले. ते म्हणाले की याशिवाय बाजाराला सप्टेंबरमधील महागाईच्या आकडेवारीची प्रतीक्षा असेल. जागतिक पातळीवर अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. त्याचेही पडसाद भारतीय बाजारावर उमटतील, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारचा विक्रीचा धडका; एअर इंडिया विकली आता ‘या’ कंपनीची होणार विक्री
निफ्टी ५० निर्देशांकाने मागील काही सत्रात चढ उतार अनुभवले. मात्र त्यातून उभारी घेण्यास निर्देशांक यशस्वी ठरला. निफ्टीला १७४५० च्या पातळीवर सपोर्ट असला तरी त्याचे सध्याचे मूल्यांकन वाजवीपेक्षा जास्त असल्याचे सॅमको या ब्रोकिंग संस्थेने आपल्या अहवालात म्हटलं आहे. तूर्त निफ्टीत मोठी घसरण दिसत नाही, असे या अहवालात म्हटलं आहे.

सणासुदीत खाद्यतेल महागले; भाववाढ रोखण्यासाठी सरकारने उचलले हे पाऊल
देशात जवळपास करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेत ९३ कोटी डोस पूर्ण झाले आहेत. या व्यापक लसीकरण मोहिमेमुळे भारत करोनाची तिसरी लाट रोखण्यास यशस्वी होईल, असा विश्वास गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजारात खरेदीचा ओघ यापुढील सत्रात देखील कायम राहण्याची शक्यता आहे.

पेट्रोल-डिझेलचा भडका; मुंबईत डिझेलने गाठली शंभरी, सलग सहाव्या दिवशी दरवाढीचा झटका
पुढील आठवड्यात अर्थव्यवस्थेची कामगिरी दर्शवणारी महत्वाची आकडेवारी सरकारकडून जाहीर केली जाणार आहे. ज्यात ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादन , सप्टेंबरमधील घाऊक आणि किरकोळ महागाई निर्देशांक जाहीर होणार आहे. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून येईल.Source link

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: